लातूरसाठी • लातूरमधूनच

माणसं. संधी.
अधिक सशक्त लातूर.

JobSetu हे फक्त लातूर जिल्ह्यासाठी तयार केलेलं जॉब पोर्टल आहे. इथल्या उमेदवारांना इथल्याच कंपन्यांशी थेट जोडणं — मध्ये दलाल नाही, कमिशन नाही, आणि सगळं मराठीत.

📞 +91 94041 80011  ·  सकाळी 10 ते रात्री 8

—नोंदणीकृत उमेदवार
—नोंदणीकृत कंपन्या
—सुरू असलेल्या व्हॅकन्सी
—वेबसाईट भेटी
JobSetu — सराव इंटरव्ह्यू
आत्ताच सुरू झालं 🇮🇳 मराठी🇬🇧 English 🇮🇳 मराठी + 🇬🇧 English

मुलाखतीला जाण्यापूर्वी बोलून सराव करा

प्रश्न ऐका → बोलून उत्तर द्या → कुठे सुधारायचं ते लगेच कळेल. मराठीत किंवा इंग्रजीत — जशी मुलाखत द्यायची, तशी भाषा निवडा.

प्रश्न ऐका → बोलून उत्तर द्या → लगेच सुधारणा कळेल.

🎙️ बोलून सराव इंटरव्ह्यू 🚶 वॉक-इन जाहिराती 🔔 जॉब सूचना ✨ AI Resume
कार्ड नको · पैसे नंतर
7
दिवस मोफत
हे सगळं आधी
वापरून बघा
नोंदणी केल्या दिवसापासून
सात दिवस सगळं खुलं
मोफत सुरू करा → पुढे हवं तरच ₹99
आमची भूमिका

JobSetu का तयार केलं?

लातूरमध्ये हुशार, मेहनती तरुण कमी नाहीत — आणि माणसं शोधणाऱ्या कंपन्याही कमी नाहीत. कमी आहे ती फक्त योग्य माहिती वेळेवर. दोघंही एकाच जिल्ह्यात असतात, पण एकमेकांपर्यंत पोहोचत नाहीत. हीच पोकळी भरून काढण्यासाठी JobSetu.

◉

स्थानिक Talent

लातूरमधल्या तरुणांना आपली कौशल्यं आणि अनुभव योग्य ठिकाणी मांडता यावेत — मोफत AI Resume सह.

↗

स्थानिक संधी

मोठी जॉब पोर्टल्स पुणे-मुंबईच्या नोकऱ्या दाखवतात. इथे फक्त लातूर जिल्ह्यातल्या, तालुक्यानुसार.

◎

विश्वासाचं व्यासपीठ

प्रत्येक कंपनी आणि प्रत्येक जाहिरात Admin कडून तपासली जाते. खोट्या जाहिराती पुढे जाऊ दिल्या जात नाहीत.

उमेदवारांसाठी

घराजवळची नोकरी, गाव न सोडता

  • तुमच्या तालुक्यातल्या आणि तुमच्या Category मधल्या खऱ्या व्हॅकन्सी
  • मोफत AI Resume — माहिती भरा, प्रोफेशनल रिझ्युम तयार
  • वॉक-इन इंटरव्ह्यू — थेट मुलाखतींच्या जाहिराती एकाच जागी
  • कंपनी थेट तुम्हाला संपर्क करते — मध्ये कोणी एजंट नाही
  • नोकरी लावून देण्याच्या नावाखाली मोठी रक्कम कधीही मागितली जात नाही
उमेदवार म्हणून नोंदणी करा
कंपन्यांसाठी

इथलीच माणसं — जी टिकतात

  • Full Time आणि Part Time — दोन्ही प्रकारच्या व्हॅकन्सी टाकता येतात
  • पडताळलेले स्थानिक उमेदवार, त्यांच्या रिझ्युमसह
  • आलेले अर्ज नवीन / निवडलेले / नाकारलेले अशा याद्यांत आपोआप
  • निवडलेल्या उमेदवाराला एका क्लिकवर कॉल किंवा WhatsApp
  • स्थानिक उमेदवार लवकर रुजू होतात आणि दीर्घकाळ टिकतात
कंपनी म्हणून नोंदणी करा
सोपी पद्धत

हे कसं चालतं

सगळं मराठीत, सगळं मोबाईलवर. चार पायऱ्या — बस्स.

1नोंदणीनाव, तालुका, शिक्षण आणि कौशल्यं भरा. दोन मिनिटांचं काम.
2पडताळणीप्रत्येक कंपनी व व्हॅकन्सी Admin कडून तपासली जाते.
3जुळणीतुमच्या तालुक्यातल्या व Category मधल्या नोकऱ्या दिसतात.
4इंटरव्ह्यूकंपनी थेट संपर्क करते. निवड झाली की लगेच कळतं.
आपला जिल्हा

आपला लातूर. आपली संधी.

आम्ही ठरवून फक्त लातूर जिल्हा हेच कार्यक्षेत्र ठेवलं आहे — कारण घराजवळची नोकरी मिळाली, तर तरुणाला गाव सोडावं लागत नाही.

केल्याने होत आहे रे,
आधी केलेचि पाहिजे.
— जुनी मराठी म्हण

जिथे तुम्ही आहात, तिथलीच नोकरी

व्हॅकन्सी शोधताना तुम्हाला तुमच्या तालुक्यातल्या संधी आधी दिसतात. कंपनीलाही जवळपासचे उमेदवार मिळतात — त्यामुळे प्रवासाचा त्रास नाही, रूम-भाड्याचा खर्च नाही, आणि दोघांचाही वेळ वाचतो.

लातूरअहमदपूरऔसाचाकूरदेवणीजळकोटनिलंगारेणापूरशिरूर अनंतपाळउदगीरमुरुड
व्यासपीठावर काय आहे

एकाच ठिकाणी, सगळं

नोंदणी केल्यावर हे सगळं तुमच्या स्वतःच्या पॅनलमध्ये उपलब्ध होतं.

💼
ताज्या व्हॅकन्सीलातूर जिल्ह्यातल्या मंजूर व्हॅकन्सी — तालुका आणि Category नुसार गाळून.
नवीन
🚶
वॉक-इन इंटरव्ह्यूवर्तमानपत्रातल्या थेट मुलाखतींच्या जाहिराती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो.
✨
AI Resumeमाहिती एकदा भरा — प्रोफेशनल रिझ्युम आपोआप तयार, मोफत डाउनलोड.
आमची माणसं

JobSetu मागची माणसं

दोघंही लातूरचेच. Founder आणि CEO — स्वतंत्र भूमिका, एकच ध्येय.

वेदांत राहुल पोतदार — Founder
FOUNDER

वेदांत राहुल पोतदार

लातूरची हुशार मुलं नोकरीसाठी पुणे-मुंबईकडे जातात, आणि इकडे लातूरच्याच कंपन्या "चांगला माणूस मिळत नाही" म्हणत राहतात. दोन्ही बाजू एकाच जिल्ह्यात, पण मधे जोडणारी साखळीच नाही — तीच उभी करायची होती.

राहुल रमेशराव पोतदार — CEO
CHIEF EXECUTIVE OFFICER

राहुल रमेशराव पोतदार

लातूरमध्ये काम आहे, माणसंही आहेत — फक्त दोघांना एकत्र आणणारा एक विश्वासार्ह पूल हवा होता. तो पूल म्हणजे JobSetu.

सदस्यत्व शुल्क

एकच सदस्यत्व — सगळं काही त्यात

नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. सगळ्या सुविधा वापरण्यासाठी सदस्यत्व घ्या. जास्त महिन्यांचं सदस्यत्व घेतलं, तर दरमहा खर्च कमी होतो.

सगळ्या किमतींमध्ये कोणतेही छुपे शुल्क नाही · GST नाही
पेमेंट UPI ने: Myjobsetu@ybl पैसे भरल्यानंतर स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपवर पाठवा — सदस्यत्व त्याच दिवशी सुरू केलं जातं.
नोंदणी व पारदर्शकता

आम्ही कोण आहोत, हे तपासून पाहा

JobSetu हा शासकीय नोंदणी असलेला व्यवसाय आहे. खालचा Udyam क्रमांक कोणीही udyamregistration.gov.in वर जाऊन स्वतः पडताळू शकतो.

✓
Udyam नोंदणी (MSME, भारत सरकार)UDYAM-MH-16-0137420
✓
Shop Act परवाना (महाराष्ट्र शासन)108260942603
✓
नोंदणीकृत पत्तालातूर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र — 413512

सुरुवात आजच करा

नोंदणी मोफत आहे. दोन मिनिटांत प्रोफाइल तयार करा आणि लातूर जिल्ह्यातल्या संधी बघायला सुरुवात करा.

मोफत नोंदणी करा आमच्याबद्दल अधिक